(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी ह्रदय स्पर्शी कविता मानकुँवर. सुश्री प्रभा जी जानती हैं कि समय गहरे से गहरे घाव भी भर देता है. किन्तु, एक नारी ह्रदय ही नारी की व्यथा को समझ सकती है. ऐसा नहीं कि सभी पुरुष संवेदनहीन होते हैं. महत्वपूर्ण यह है कि ऐसी कविता की रचना का होना उनके संवेदनशील ह्रदय में एक संवेदनशील साहित्यकार का जीवित होना है. ऐसी रचना के लिए उस पात्र को जीना होता है और इतिहास के पात्रों को वर्तमान के पात्र के मध्य सामंजस्य बनाना होता है.
सुश्री प्रभा जी का साहित्य जैसे -जैसे पढ़ने का अवसर मिल रहा है वैसे-वैसे मैं निःशब्द होता जा रहा हूँ। हृदय के उद्गार इतना सहज लिखने के लिए निश्चित ही सुश्री प्रभा जी के साहित्य की गूढ़ता को समझना आवश्यक है। यह गूढ़ता एक सहज पहेली सी प्रतीत होती है। आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 14 ☆
☆ मानकुँवर ☆
आज अचानक आठवलीस तू
मानकुँवर —-
पब्लिक मेमरी शॉर्ट असते म्हणतात, ते अगदी खरं आहे !
किती अस्वस्थ झाले होते मी,
वर्तमानपत्रातल्या तुझ्या हत्येच्या
बातमी नं !
नखशिखांत हादरलेच होते,
ज्यांनी केला तुझा खून ते तुझे बाप, भाऊच सख्ये !
आणि तुझा गुन्हा तरी काय ??
तू केलंस प्रेम–
जातिधर्मात किंचित फरक असलेल्या—
तुला आवडलेल्या तरूणावर !
मानकुँवर
तू होतीस उच्चशिक्षित–
डॉक्टर !!
तुझं नाव मानकुँवर ठेवणारांनी
तुला मानानं जगूच दिलं नाही,
आणि मरण ही किती अपमानास्पद !
मानकुँवर आज आठवलीस तू,
“भूले बिसरे गीत” मधल्या दर्दभ-या गाण्या सारखी!
मानकुँवर —
तू खानदान की ईज्जत,
तू शालीनता, तू मर्यादा,
तू नंदिनी तू बंदिनी ——-
युगानुयुगे भळभळणारी एक जखम —-
स्री जाती च्या प्रारब्धावरची !
तू चिरंजीवी ——
तुला मरण नाही !
पण तू मागत नाहीस तेल—-
द्रौपदी च्या पाच पुत्रांना मारणा-या पापी आश्वत्थाम्यासारखी,
कारण तू स्री आहेस,
तू ब-या करतेस स्वतःच्या जखमा,युगानुयुगे—-
आणि ते करतच आहेत वार आजतागायत !
डॉ. मानकुँवर सहगल !!
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]