श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ खेळ शब्दांचा…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
शब्दांचाच खेळ शब्दांच्याच संगे
शब्दांच्या प्रवाही जीव हा तरंगे
☆
शब्दांच्या अंगणी शब्दांचे चांदणे
शब्दांचा बहर मनात फुलणे
☆
शब्दरुपी धन शब्द हे जीवन
शब्दांचेच मग मिळो मज दान
☆
शब्दांचा संसार शब्दांचा व्यापार
शब्दांचा आचार शब्दांचा विकार
☆
निःशब्द का झाले जर माझे शब्द
होईल हे माझे जीवन ही स्तब्ध
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈