महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 155
☆ हे शब्द अंतरीचे… बंध जीवनाचे…!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
(अष्ट-अक्षरी…)
☆
कसे आयुष्य असावे
याचा विचार करावा
शांत वृत्ती मन शुद्ध
संग चांगला असावा…!!
☆
संग चांगला असावा
क्षण इथे महत्वाचा
वेळ थांबत नाहीच
घ्यावा माग अनेकांचा…!!
☆
घ्यावा माग अनेकांचा
दृष्टी असावी सोज्वळ
मित भाष्य प्रेमभाव
मनी नसावे कश्मळ…!!
☆
मनी नसावे कश्मळ
स्नेह भावना जपावी
घ्यावा निरोप सप्रेमे
अशी तयारी असावी…!!
☆
अशी तयारी असावी
राज माझ्या मनीचे
उक्त केले सहज मी
जपा बंध जीवनाचे…!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈