सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
लाभो सानिध्य थोरांचे
सार्थक हो जीवनाचे
पूज्य भाव त्यांच्या प्रति
विचारांच्या आदर्शांचे
अनुभवी असे बोल
ज्ञान बुध्दी त्यांच्याकडे
उपदेश अनमोल
नेती कसे उंचीकडे
धन्य धन्य हे जीवन
आशीर्वाद मिळे जर
वाटचाल होते सोपी
खडतर मार्गावर
दिशा मिळे आपोआप
सल्ला थोरांचा मानावा
ध्येयाकडे जाण्यासाठी
त्यांचा आधार शोधावा
छत्रछाया कृपा त्यांची
नित्य सहज लाभावी
जीवनाची इतिश्रीही
सानिध्यात त्यांच्या व्हावी
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈