सौ. नीला देवल
कवितेचा उत्सव
☆ रामल्ल्ला मुखदर्शन ☆ सौ. नीला देवल ☆
आयोध्या राम लल्ला मुखदर्शन
लोभस लडिवाळ संकर्षक राजस रुपडे
हास्य मनमोहक दिल खेचक, देखता क्षणी प्रीत जडे
किती पाहू जाता तरीही अपुरे
दीन वाणे चक्षु अपुरे पडे
प्रफुल्लित कमलही लाजून गेले तव चरणी पदीलीन झाले
नयनही हासरे, कपोल गोबरे,
अधरी मोहक हास्य फुललेले
असे अलौकिक पाहता रुपडे
पाहता पाहता मन खुळावले
नेत्री किती साठविले मोहक ते रूप
आनंद अश्रुनी चिंब ते भिजले
हृदयी कळवळा मनी मोह मोहित,
मोदे हिंदोळा झुले झुला आनंदाचा
मनमोहना, मेघश्यामा, रामा रघुनंदना
भुलविशी मनी मोह घालूनिया
पाहता पाहता पहातची राहिले
भान विसरले जगताचे
किती गोड, मधुर मधाळ ते हास्य
मध शर्करा ही फिक्की पडे
आश्वासक, शाश्वत अमूल्य हास्याने राम लल्ला मला भुलविले, नेत्र सुखावले.
© सौ.नीला देवल
९६७३०१२०९०
Email:- [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈