श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
लावा एक पणती ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
राख झाली क्षणात लाखोंची
नाही फिकीर पर्यावरणाची,
वृद्ध, आजारी असतील कोणी
का काळजी करू कोणाची ?
*
हौसेला मोल नसलं तरी
थोडं तरी समाजभान ठेवा,
ज्या घरी नाही लागत पणती
त्यांची तरी आठवण ठेवा !
*
साध्या कंदील, रोषणाईने
दिवाळी होते बघा साजरी,
मदत करून गोर गरिबांना
हास्य आणा त्यां मुखांवरी !
*
गडबडीत या दीपोत्सवाच्या
लावा एक पणती त्यांच्यासाठी,
नका विसरू शूर सैनिकांना
जे रक्षितात सीमा देशासाठी !
जे रक्षितात सीमा देशासाठी !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈