महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 159
☆ हे शब्द अंतरीचे… माझी आई… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
(चाल :- आये हो मेरे ज़िन्दगी में तुम बहार बनके (राजा हिंदुस्थानी))
☆
माझी आई माझी आई, दिला जन्म तिने मजला
माझी आई माझी आई, दिला जन्म तिने मजला
कसा होऊ उतराई, दिला जन्म तिने मजला… धृ
*
खूप कष्ट तिला झाले, खूप त्रास तिला झाला
नऊ मास तिने मजला, पोटात वाढविला
सांगा तुम्ही हो मजला, तिला काय देऊ आजला…१
*
दिनरात काम केले, संसार चालविला
माझ्याच साठी आई, संसार पूर्ण केला
किती प्रेम मला दिले, शब्द न स्फुरती मजला…२
*
शब्द निःशब्द होता, अश्रूंचा बांध फुटला
वात्सल्य तुझे आई, चाफ्यास बहर आला
आयु हे माझे सर्व, अर्पण करतो तुजला…३
*
अशी माझी आई जननी, ऋणानुबंध फुलला
आई-विना कुठे मग, शोभा ये अंगणाला
वसंत ऋतु जीवनी, आई मुळेच आला…४
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈