श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ स्वरुप शब्दांचे…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
शब्दांना किंमत असते
शब्दांना वजन असते
शब्दांना खोली असते
शब्दांना उंचीही असते
हे शब्दांनो,
तुमचं खरं स्वरुप कळण्यासाठी
तुम्हाला प्रसन्न करुन घेण्यासाठी
बांधेन मी पूजा तुमची ,
भक्ताने ईश्वराची बांधावी तशी.
प्रसाद म्हणून द्या
फक्त शब्द फुले.
त्या शब्द फुलांच्या माळांनी
सजवावे मी
महाराष्ट्र सारस्वताचे मंदिर !
एक जरी मोगरा फुलला
माझ्या हातून
तर,हे शब्दांनो,
मी कायमचाच ऋणी राहीन.
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈