सुश्री नीता कुलकर्णी
☆ ‘असंही होतं कधी कधी…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
फोन करून
व्यवस्थित वेळ ठरवून ती आली
कॉफी गप्पा
विषय तरी किती
अध्यात्म ते चॅट जीपीटी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
मोदी तर हवेतच…
हिंदुत्व वगैरे वगैरे ..
नवीन पुस्तकं
नंतर थोडं फार खाणं
मग रेसिपी
वेळ कसा गेला कळलंच नाही
जाताना म्हणाली
येईन ग परत….
बरं बरं…..
कधीतरी येईल ती….
नुसतीच शरीरानी नाही तर
बरोबर धैर्य …
आत्मविश्वास …घेऊन..
…… मगच ती खरंखरं बोलेल…. मनात साठलेलं…
असू दे…
…. असं होतं कधी कधी….. मी वाट बघीन….
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈