सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 218 ?

☆ राजा शिवछत्रपती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

प्राणाहून प्रिय आम्हा

राजा शिवबा आमुचा

पराक्रमी, धीरोदात्त

रखवाला जनतेचा …..१

*

नाही या सम दुसरा

एकमेव   शिवराज

स्वराज्याचा ध्यास ज्यास

कावा गनिमी अंदाज…..२

*

माजलेली मोगलाई

थोपविण्या सज्ज असे

लेकीबाळी रक्षिण्यास

कटिबद्ध नित्य दिसे….३

*

जमविले शूरवीर

किती,मावळे अफाट

होते तानाजी, गोदाजी

बाजीप्रभू ते विराट…..४

*

शत्रू होता बलदंड

बादशहा शिरजोर

त्यास आणले जेरीस

हातावर देत तूर…..५

*

आग्र्याहून सुटकेचा

नामी डाव आखला

प्राण देण्या सज्ज साथी

पाया त्यायोगे रचला…..६

*

महा पराक्रमी गाथा

माझ्या शिवाजी राजाची

साक्ष माता भवानीची

राजे शान भारताची…..७

© प्रभा सोनवणे

१९ फेब्रुवारी २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments