सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री राजीव पुजारी
💐अ भि नं द न 💐
विशेषतः ‘अंतराळ-विज्ञान‘ हा सहजपणे न समजणारा विषय आपल्या सुबोध शैलीमुळे सोप्पा करून त्याची तपशीलवार माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध करून देणारे आपल्या समूहातील लेखक म्हणजे श्री. राजीव पुजारी हे होत. नुकतेच त्यांनी लिहिलेले “अंतराळवेध“ हे असेच उपयुक्त माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. यासाठी श्री. पुजारी यांचे आपल्या अभिव्यक्ती समूहातर्फे हार्दिक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री प्रदीप केळुसकर
💐अ भि नं द न 💐
आपल्या अभिव्यक्ती समूहासाठी वेगवेगळ्या विषयांवरच्या सुरेख कथा नियमितपणे सादर करणारे कथाकार श्री. प्रदीप केळुसकर यांच्या बक्षिसपात्र ठरलेल्या सतरा कथांचा संग्रह “माणिकमोती“ या शीर्षकांतर्गत नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे श्री. केळुसकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि लोकप्रिय अशा विपुल साहित्य निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈