कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 212 – विजय साहित्य ?

☆ [1] नारी रूप [2] मानस पूजा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

☆ [1] नारी रूप ☆

(जागतिक महिला दिनानिमित्ताने..)

घरा घरपण

जिच्यामुळे येते

पूर्ण रूप देते

नरा नारी…..! १

*

पती आणि पत्नी

शिव आणि शक्ती

प्रेम प्रिती भक्ती

भारवाही….! २

*

आई,बाई,दाई

वात्सल्य आगर

संसार सागर

नारी रुप….! ३

*

ताई,माई,अक्का

आज्जी,काकी,मामी,

गुणदोष नामी

सामावले….! ४

*

सखी,राज्ञी,माता

नारी शक्ती रूप

चैतन्य स्वरूप

ललना‌ ही…! ५

*

संस्कार जनक

माहेरचा वसा

सासरचा ठसा

निजरूपी…! ६

*

भाव भावनांचे

मूर्त रूप नारी

सुख, दुःख, हारी

आदिमाया….! ७

*

विश्व वंदनीय

भाग्यश्रीची छाया

कविराज माया

कवनात…! ८

☆ [2]  मानसपूजा ☆

*

नमो शंकरा जपात आहे,

कैलासाची माया

शिव स्वरूपी,भालचंद्र तू,

चैतन्याची छाया.

*

निळी निळाई, फणींद्र माथा

चराचरी वास

शंख डमरू,त्रिशूलधारी,

ओंकाराचा न्यास.

*

निलकंठ तू, त्रिनेत्रधारी,

शोभे सिद्धेश्वर

 ब्रम्हांडधीशा उमापती तू,

स्वामी विश्वेश्वर.

*

शिवपिंडीचा महादेव तू

नंदी भक्तगण

शिव नामाने,पहा व्यापिले

त्रैलोक्याचे मन.

*

पंचाक्षरीच्या,नाम जपाने

घेतो देवा नाम

पंचामृती ही,मानस पूजा

सेवा‌ ही निष्काम.

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments