सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “निसर्गाचे लेणे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
देखण्या फुलांनी
किती हे फुलावे ?
झाडाचे सौंदर्य
किती वर्धीत व्हावे !
*
जणू अंथरे सृष्टी
मखमाली पाती
विखुरले तयावर
शुभ्र धवल मोती
*
जवळ जाऊ पहाता
दरवळे सुगंध
केवळ पहाताच
दृष्टी सुखात धुंद
*
निरपेक्ष देत जाणे
निसर्गाचेच लेणे
अवलंबून आहे
शिकणे न शिकणे
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈