सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ माझी माय मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
काव्यप्रकार (भावगीत)
(शब्दसेतू साहित्य मंच, पुणे महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा पुरस्कार प्राप्त कविता)
☆
माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी ||धृ||
*
शारदेस मी आळविते
अन वीणा झंकारिते
आगमने हर्षित होते
नतमस्तक मी बनते ||१||
*
कवितेसह हर्षे मेते
भारुड,गवळण गाते
पोवाड्यातुनी ही रमते
ओव्यामधूनी ती सजते ||२||.
*
विश्वात कथेच्या फुलते
शब्दालंकारे खुलते
वास्तवास न्याय ही देतै
आविष्कारातुनी नटते ||३||
*
कधी कादंबरी ही बनते
अन शब्दांसह डोलते
भेदक,वेधक तीठरते
सकलांनाकाबिज करते ||४||
*
लालित्ये ही मांडिते
संवादानी उलगडते
तेजोन्मेषे नि पांडित्ये
मोहिनी जणू घालिते ||५||
*
सारस्वतासी जी स्फुरते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते
विश्वाला स्पर्शही करते ||६||
☆
© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी
हैदराबाद.
भ्र.९५५२४४८४६१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈