श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
खरी धुळवड ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
नाते तुटले जन्माचे
साऱ्या खऱ्या रंगांशी,
डोळ्यांसमोर कायम
काळी पोकळी नकोशी !
*
काया दिली धडधाकट
पण नयनांपुढे अंधार,
समान सारे सप्तरंग
मनात रंगवतो विचार !
*
तरी खेळतो धुळवड
चेहरा हसरा ठेवुनी,
दोष न देता नजरेला
लपवून आतले पाणी !
छायाचित्र – शिरीष कुलकर्णी, कुर्ला.
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈