सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ. निशिकांत श्रोत्री
सुश्री ज्योत्स्ना तानवडे
💐 मनःपूर्वक अभिनंदन 💐
सुंदर कविता आणि त्यासोबत कवितेचं तितकंच सुंदर रसग्रहण वाचकांना एकत्रित वाचता येईल अशी एक अभिनव संकल्पना साकार करणारे “मुक्तायन” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
यातील कविता आहेत आपल्या समूहातील ज्येष्ठ सिद्धहस्त कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या, आणि यातील प्रत्येक कवितेचं समर्पक रसग्रहण केलं आहे आपल्याच समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सौ. ज्योत्स्ना तानवडे यांनी. या आगळ्यावेगळ्या प्रयोगासाठी डॉ. श्रोत्री आणि सौ. तानवडे या दोघांचेही ई- अभिव्यक्ती समूहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि यापुढच्या अशाच नवनव्या साहित्यनिर्मितीसाठी दोघांनाही असंख्य शुभेच्छा.
या संग्रहातील एक कविता आणि त्याचे रसग्रहण वाचा आजच्या “काव्यानंद” या सदरात.
तसेच आजच्या “पुस्तकावर बोलू काही” सदरात या पुस्तकाचे परिक्षणही वाचता येईल.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈