वाचताना वेचलेले
☆ फांदीवरची पिवळी पाने – कवी : श्री. के. यशवंत ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
फांदीवरच्या पिवळ्या पानांना तोडू नका,
एक दिवस ती आपोआप गळून पडतील.
बसत जा घरातील वडीलधारी मंडळींबरोबर, बोलत राहा,
एक दिवस ती आपोआप शांत होतील.
होऊ द्या त्यांना बेहिशेबी, खर्चू द्या, मनासारखं वागू द्या,
एक दिवस ती आपोआप तुमच्या साठी इथेच सर्व सोडून जातील.
नका टोकू त्यांना सारखं सारखं, तेच तेच बोलत राहतात म्हणून,
एक दिवस तुम्ही तरसून जाल, त्यांचा आवाज ऐकायला, जेव्हा ती अबोल होतील.
जमेल तेवढा आशिर्वाद घ्या त्यांचा, वाकून, पाया पडून,
एक दिवस ती आपोआप जातील वर तसबीर बनून,
अर्थ नाही मग तुमच्या माफीला, नतमस्तक होऊन, कान धरून.
नका बोलू चार चौघात त्यांना,
खाऊ दे थोडं मनासारखं,
मग बघा येणार पण नाहीत जेवायला,
भले करा श्राद्ध, सारखं सारखं.
कवी: श्री. के.यशवंत
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈