सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
– “प्रमोदिनी ही घाली मोहिनी…” – ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆
☆
फुलूनी आल्या पहा खुळ्या
वेली वरती धुंद कळ्या
वारा येऊन लटके छेडी
गंधाळून गेल्या सगळ्या
*
फूल टपोरे पाना मागे
बहरून आले पहा कसे
प्रमोदिनी ही मोहिनी घाली
चैत्राची चाहूल सांगतसे
*
मल्लिगेस या गुंफुनी केला
वळेसार मी मनमोही
कुरळे कुंतल सळसळणारे
पहा शोभती आरोही
*
वेड लावितो जीवाला
श्वेतरंग भुलवी मजला
ओंजळ भरुनी इरावंतिगे
भगवंताच्या चरणतला
☆
(इरावंतिगे म्हणजे मोगरा (कानडी भाषेत), मल्लिगे म्हणजे मोगरा (कानडी), प्रमोदिनी म्हणजे मोगरा (संस्कृत))
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈