कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 220 – विजय साहित्य
☆ महाराष्ट्र गौरव ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
महाराष्ट्र ही माझी भुमी , सृजनाचे वरदान
शुरवीरांची शौर्य शलाका , हा अमुचा अभिमान. ! धृ.!
*
पायाभूत सुविधांचे देणे, वसल्या किती प्रजाती
विकास आणि प्रबोधन ते, देई शक्ती सकलांसी
माय शारदा आणि लक्षुमी, करती सौख्य प्रदान…!१!
*
शिवार माती,छत्र कृपेचे, सोने चांदी पिकवीते
राज्य विकासी, मूर्त योजना ,या भुमीला घडवीते
ऊर्जा, शिक्षण , उद्यम क्षेत्री, कर्तृत्वाचे नाही वाण…!२!
*
सप्त नद्यांचे,संजीवन हे, सृष्टी सारी जगवीते
एक होऊनी, सणवाराला, भेदभावा हरवीते
माणूस आहे,माणूस राहू, शिकवी मंत्र महान….!३!
*
लोक कलांचे, हे विद्यापीठ, हौतात्म्यांची आहे धरा
घरा घरातून ऐकू येई , संस्कारांचा बोल खरा
मती गतीचे, सुरेल देणे, हा महाराष्ट्र सन्मान…!४!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈