चित्रकाव्य
ज्याचे त्याचे श्रद्धास्थान… – चित्र एक काव्ये दोन सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆
☆
सुश्री नीलांबरी शिर्के
( १ )
ज्याचे त्याचे श्रद्धास्थान
ज्याला त्याला प्रिय असते
दारूची बाटली म्हणूनच
दारुड्याला प्रिय असते
*
रिकामी झाली तरीही
तिनेच नभात उंच नेले
दिवसाढवळ्या मनाला
एक वेगळे जग दिले
*
अशी ही रिक्त बाटली
त्याचे श्रद्धास्थान बनते
भक्तिभावे म्हणून तिची
मनोभावे पूजा होते
*
दारूच्या बाटली बाई
नेहमीच तू प्रसन्न रहा
वेगवेगळ्या रूपामधे
मला तू भेटत रहा
*
नित्य तुझी पुजा करीन
भरलेली असो वा रिकामी
सेवेत खंड पडणार नाही
शपथ घेऊन देतो हमी
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆☆☆☆
( २ )
श्री आशिष बिवलकर
☆
चषक मदिरेचे रिचवून,
रिक्त केली बाटली |
श्रद्धेने फुल पान अर्पून,
श्रद्धा मनात दाटली |
*
नशा दारूत असती,
तर ती ही नाचली असती |
नशेबाज माणूस असतो,
उगाच बदनाम झालीय ती |
*
भरलेली असताना,
तळीरामांना खुणावत असते |
अप्सराही फिकी वाटावी,
इतकी ती मादक भासते |
*
कृतघ्नतेच्या दुनियेत,
दुर्मिळ एक श्रद्धावान असतो |
पान फूल वाहून,
मिळाल्या तृप्तीला जागतो |
*
छोटा रिचार्ज, क्वार्टर , खंबा,
तिची विविध परिमाण आहेत |
ज्याची त्याची रिचवायची ताकद,
आरोग्यावर तिचे परिणाम आहेत |
*
कितीही समाजवा त्याला,
दारू ही सर्वात वाईट आहे |
फरक नाही पडत त्याला,
तळीराम मोहात टाईट आहे |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈