श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 238 ?

☆ मातृदिनानिमित्त – भूक प्रीतिची ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीव गुंतला केवळ माझा

फुगली छाती तुटला काजा

*

मन हे माझे येते बहरुन

रोज भेटणे होते चोरुन

नकोच त्याचा गाजावाजा

जीव गुंतला केवळ माझा

*

प्रीत जडाया बहू कारणे

प्रीत सोडुनी ‌नसे मागणे

भूक प्रीतिची माझा राजा

जीव गुंतला केवळ माझा

*

समजुन घे ना माझा हेतू

बंद पापण्या मिटून घे तू

नकोच उघडा तो दरवाजा

जीव गुंतला केवळ माझा

*

सरपण होते चूल पेटली

तवा भाकरी अशी भेटली

पाणी लावा खमंग भाजा

जीव गुंतला केवळ माझा

*

लाल गुलाबी गर्द पाकळी

तुझ्याचसाठी आहे मोकळी

नको मुखी तो आता बाजा

जीव गुंतला केवळ माझा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments