सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 231 ?

☆ दुनियादारी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आजकाल शोफर ड्रिव्हन कार असणं,

हे खूप मोठं स्टेटस मानलं जातं,

विचारलं परवा,

एका नातेवाईकानं,

यायचंय का मुंबईला?

म्हटलं “कसे आले आहात?”

तर ते म्हणाले,

माझ्याकडे शोफर ड्रिव्हन कार असते !

मी म्हणाले… “ओह्ह ग्रेट!”

 

आता प्रवासभर असंच काही

ऐकावं लागणार,

याची कल्पना आलीच!

 

तरीही गाण्याचा चाॅईस

चांगला होता…..

चलो न गोरी मचल मचलके….

खूप वर्षानी ऐकलं !

सी. एच. आत्माचा आवाज

मनाला वेढून राहिला

असतानाच,

 

काल “तू डायरेक्ट इकडेच ये रिक्षाने”

असं म्हणून फोन

कट करणारणीचा फोन,

 

म्हटलं, “मी प्रवासात आहे” !

“उद्या येतीयेस ना संध्याकाळी”

म्हटलं, “नाही” अगं….

परत कालच्या सारखाच,

फोन कट !

 

मी हसले स्वतःशीच!

आपल्याला दुनियादारी

समजली नाही….

की,

ही रीतच आहे दुनियेची,

“मुझसे बडा न कोय”!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments