सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “साक्षात्कार…—” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
मनी झरे का अवचित झरझर
अवखळ श्रावणसर
अलगद कानी गुणगुणती अन्
बासरीचे सूर मधुर ….
निळे सावळे भासे का नभ
प्रसन्न जरी दिनकर
निरभ्र असुनी भवती सारे
मनी दाटे हुरहूर ….
जग सारे हे तसेच येथे
मनाची परि भिरभिर
शोधू लागले कोठून आली
नकळत श्रावणसर ….
मग क्षणात चमके इंद्रधनू अन्
सूर्य हसे हळुवार
लख्ख दिसे मज मनी दडलेला
कृष्णसखा सुकुमार ….
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈