? कवितेचा उत्सव ?

चहाची महती…☕ ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

मिळाले स्वातंत्र्य अन् चहाचे लागले व्यसन

लागली चटक आणि जिंकले चहाने सर्वांचे मन

*

जो तो उठसूठ चहा पिऊ लागला

पाहुणचार चहाचा बिनदिक्कत करू लागला.

*

चहा शिवाय मुलगी बघणे अपमान वाटू लागला

साधा चहा पण दिला नाही हा शब्दप्रयोग रूढ झाला

*

मुलीला चहा पण साधा येत नाही हे वर्णन करायला लागले

चला चहा घेऊ हे वाक्य टेबला खालून राजरोस सुरू झाले

*

टपरीवरील चहा, हाॅटेल चहाला मारक ठरला

क्रिकेटच्या मॅचेस टपरीवरील टी.व्ही.वर झडू लागल्या.

*

काॅलेज कॅंटीनचा परिसर चहाच्या वासाने दरवळायला लागला

लंच ब्रेक मध्येही चहाच्या फेर्या वाढायला लागल्या

*

 मुलांची पावले आपसूकच तिकडे वळायला  लागली

तरुणाईची झिंग कॅंटीनच्या आवारात चढायला लागली.

*

इलेक्शनला चहाच्या किटल्या भरभरून रिकाम्या झाल्या

गर्दीच्या चहाच्या कपाच्या वार्या झडू लागल्या

*

कर्तृत्ववान माणसं चहाच्या एका कपाचा मी मिंधा नाही असं म्हणून मिरवू लागली

वृद्ध माणसं चहाची वेळ झाली म्हणून ऊन्ह कलल्यावर स्वैपाकघरात डोकावू लागली.

*

चहाने एक काम  मात्र चांगले केले

अभ्यासासाठी जागण्यास प्रोत्साहन दिले

*

चहा बाज,चहा चा चहाता,चहा प्रेमी या विशेषणांची भर पडली

अन् पेयांचा राजा म्हणून चहाची चलती झाली.

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments