श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ घायाळ हरणी... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
नको मोहवू हरणी
तुझी जाणीव करणी
उगी काळीज झुरणी
स्मृती मारिच’स्फुरणी.
*
रामायणही घडते
मायाजाळ हे अजाण
मृगजळ तुझे रुप
कस्तुरी गंध बेभान.
*
संसारी तुझे वलय
हरणी विश्व घायाळ
श्रीराम फसतो तेंव्हा
रावण जिंके आभाळ.
*
मनात भाव अजब
नयनी प्राण प्रेमळ
सौंदर्य तुझे सांभाळ
आयुष्य मुक्त सकळ.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈