श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 240 ?

☆ कुटील कावा आनंदकंद☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

संसार संपदेशी नाही कधीच केला

होकार मी दिलेला निःस्वार्थ भावनेला

*

प्रेमात वादळाचे येणे कमाल नाही

पाहून सख्य अपुले तोही निघून गेला

*

तू सागरात आहे मी टाकलेय जाळे

जाळ्यात मासळीचा दमछाक जाहलेला

*

कटला पतंग होता नव्हते भविष्य त्याला

तू झेलल्यामुळे तो आहेच वाचलेला

*

हुंकार देउनी तो वारा पसार झाला

नाही कुणीच सोबत एकांत जागलेला

*

पसरून चादरीवर आकाश चांदण्यांचे

वाटेवरील डोळे हातात दुग्ध पेला

*

नाही कुटीळ कावा सत्यावरी भरवसा

देऊ कशास थारा नादान कल्पनेला

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments