सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ कविता होते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(वृत्त अनलज्वाला, मात्रा ८+८+८ =२४)

वसुंधरेला फुलवायाला पाउस आला

शेतकर्‍याला हसवायाला पाउस आला

*

मिलनाची का ओढ लागली या धरणीला

श्रृंगाराने सजवायाला पाउस आला

*

गर्भामधल्या अंकुरामधे  नवीन आशा

जीवन त्यांचे घडवायाला पाउस आला

*

चैतन्याची फुटे पालवी  चराचराला

हौस धरेची पुरवायाला पाउस आला

*

वारीचे का वारकरी हे थेंब जाहले

भेट विठूची घडवायाला पाउस आला

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments