कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 226 – विजय साहित्य
☆ द्या आम्हा प्रेरणा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
द्या आम्हा प्रेरणा
दान धर्मातून
कळे कर्मातून,
पदोपदी. . . ! १
*
माय बाप तुम्ही
काळजाची छाया
जपतोय माया,
उराउरी. . . ! २
*
द्या आम्हा प्रेरणा
संवादाचा नाद
टाळतोच वाद,
अनाठायी. . . ! ३
*
जीवन प्रवास
अनुभवी धडा
चुकांचाच पाढा,
वाचू नये. . . . ! ४
*
द्या आम्हा प्रेरणा
पिढ्यांचे संचित
कुणी ना वंचित
सन्मार्गासी . . . ! ५
*
द्या आम्हा प्रेरणा
यशोकिर्ती ध्यास
कर्तव्याची आस
आशिर्वादी. . . . ! ६
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈