श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ हलधर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कोण मारतो फुंकर आहे

विझत चालल्या अंगारावर

चिथावणीने  नाचत  होते

कुडामुडाचे थकलेले घर

*

संध्याकाळी मावळतीला

तुफान झाले होते वादळ

आभाळाला कळले नाही

तारे  होते  फिरले गरगर

*

दिवस उगवला प्रभात झाली

डोंगर  माथा  बघत  राहिला

चमकत होती  पूर्व दिशेने

पांघरलेली  भगवी  चादर

*

दवात भिजल्या पानफुलांनी

हार  घातले  गळ्यात  सुंदर

भिडला  वारा  आनंदाने

दवमोत्यांची झाली थरथर

*

भिजली माती रानामधली

स्वागतकरण्या तयार झाली

ताडमाड ही  उभे  ठाकले

झुकवत माथा राखत आदर

*

हासत खेळत अखंड होते

बरसत पाणी आभाळाचे

रानामधल्या दगडाला ही

मग मायेचे फुटले  पाझर

*

तेज धरेवर येते तेव्हा

माणसातला फुलतो मानव

मरगळलेला जीव येथला

उत्साहाने  होतो नवथर

*

घामगाळतो मातीवरती

 करतो सेवा तिची निरंतर

स्वतंत्रतेने अविरत राबत

अभिमानाने जगतो हलधर

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments