वाचताना वेचलेले
☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
काल मी पावसाला विचारलं
तुझं वय काय?
पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,
जर तू पावसात सैरावैरा
आनंदात धावतअसशील
तर माझं वय १०
जर तू पावसात
कविता लिहित असशील
तर माझं वय १६
जर तुला पावसात
विरह जाणवत असेल
तर माझं वय १८
जर तुला पावसात
ट्रेकिंगला जावंसं वाटत
असेल,
तर माझं वय २४
जर तुला पावसात
गजरा घ्यावासा वाटत असेल
तर माझं वय ३०
जर तुला मित्रांसोबत
पावसात भिजत भजी
खावी, असं वाटत असेल
तर माझं वय ४०
जर तुला पावसात
छत्री घ्यावी लागली,
तर माझं वय ५०
मग मी पावसाला म्हणालो
“अरे, एक काय ते वय सांग,
शब्दात गुंतवू नकोस!”
स्मितहास्य देऊन म्हणाला पाऊस,
तू जसे अनुभवशील
तेच माझे वय!
पावसाळ्याच्या ओल्याचिंब शुभेच्छा!
☆
लेखक :अज्ञात
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈