सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सोंगटी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(गालगागा गालगागा गालगागा गा)

सोंगटी मी या पटावर खेळते आहे

खेळताना नेहमी मी हासते आहे

*

हार किंवा जीत या खेळात ठरलेली

रात्र सरुनी सूर्य येईल थांबते आहे

*

का करू मी काळजी सार्‍या जनाची या

कोण कसले भोवताली जाणते आहे

*

ज्या प्रमाणे कर्म ज्याचे फळ तसे मिळते

पात्र मीही ज्या फळाला चाखते आहे

*

चूक झाली एकदा जी ना पुन्हा व्हावी

याचसाठी मी सदा सांभाळते आहे

*

खेळताना वाटला प्रारंभ सुंदरसा

वाकडी मज वाट मधली वाटते आहे

*

हात तू माझा कधी धरशील का देवा

भिस्त सारी मी तुझ्यावर सोडते आहे

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments