सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ ताकास तूर न लागू देणे… लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
‘ताकास तूर न लागू देणे.’ ही म्हण आपणास परिचित आहेच.
या म्हणीचा प्रचलित अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला अजिबात पत्ता लागू न देणे.
पण इथे ताक हा दही घुसळून केलेला पेयपदार्थ आणि तूर म्हणजे एक द्विदल कडधान्य अभिप्रेत नाही. तसा असता तर या म्हणीचा आणि त्याच्या अर्थाचा अर्थाअर्थी संबंध लागला नसता. तर याविषयी वेगळी माहिती आहे ती अशी…
इथे ‘ताक’ शब्द नसून ‘ताका’ शब्द आहे.
ताका म्हणजे कापडाचा तागा. जुन्या शब्दकोशात हा अर्थ दिला आहे.
आणि तूर हे द्विदल धान्य असा अर्थ इथे नाही. हातमागावर कापड विणण्यासाठी धागे गुंडाळून घ्यायचे जे विणकराच्या डोक्यावरचे आडवे लाकूड/तुळई असते तिला ‘तूर’ असे म्हणतात. हा ही शब्दकोशातील अर्थ आहे.
म्हणजे या म्हणीचा शब्दशः अर्थ असा की, ताग्याचा आणि तुरीचा संबंधच येऊ न देणे. थोडक्यात एखादी गोष्ट पार पडण्यासाठी जो कळीचा घटक आहे, तोच होऊ न देणे किंवा होणार नाही ह्याची काळजी घेणे.
तर अशी आहे ‘ताकाच्या तुरी’ची गंमत !
लेखिका : सुश्री मुग्धा पानवलकर
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈