श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 247 ?

☆ मी घसरते ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नीज येता येत नाही चांदणे डोळ्यात सलते

रात्र आहे मख्ख जागी स्वप्न माझे दूर पळते

*

पेटलेला हा निखारा शांत झाला अन तरीही

थंड राखेच्या ढिगावर एक भाकर रोज जळते

*

काल घरघर करत होते एक जाते पाहटेला

आज तेही मूक आहे अन तरीही पीठ दळते

*

कोरड्या डोळ्यात माझ्या होय सागर त्यात लाटा

हे कुणाला कळत नाही पापण्यांना अश्रु छळते

*

चांदण्यांना पेंग आली झोपुनी गेल्या पहाटे

मी तशी जागीच आहे पाहुनी मज झोप हसते

*

तू बरसतो मी तुझ्यावर प्रेम करते पावसा रे

वाट होते ही घसरडी आणि त्यावर मी घसरते

*

सैल होताना मिठी ही हुडहुडी छळते गुलाबी

दामिनी धावून येता चूक झाली हेच कळते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments