श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “पाऊस पहिला…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
पाऊस पहिला,
भिजवून गेला,
थंडी अजून बाकी।
मनात शिरला,
स्मृतीत उरला,
आठव अजून बाकी।
वर्षा सरली,
वर्षे सरली,
इच्छा अजून बाकी।
पुन्हा भिजावे,
धुंद फिरावे,
जोश न आता बाकी।
धरती भिजली,
मनेही भिजली,
काय राहिले बाकी?
वृत्ती थिजली,
गात्रे थिजली,
जीवन अजून बाकी।
☆
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈