श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सावळा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

ना फिक्का पांढरा

ना गर्द काळा

कातरवेळेचा साथी

श्यामसुंदर सावळा

*

दैवी अलंकारांविना

दिसे खरे सौंदर्य

माणूस म्हणून जयाचे

वादातीत आहे कर्तृत्व

*

किती आले अन् किती गेले

कधी ना कधी स्वतःसाठी रडले

स्वतः जन्मून कुशीत मृत्यूच्या

त्याचे डोळे इतरांसाठीच ओले

*

कुणी पाजे दूध विषारी

कुणी बांधे झाडास

राधाही जाई सोडून तरीपण 

हृदय फुलांचे कळे तयासच 

*

उदास राजे अन् जनता

जिवंत चिखल हताश

तो कायम आशावादी जिथे

अर्जुनासारखा अर्जुन निराश

*

जीवनाचे इतके प्रेम

इतरांत दिसत नाही

स्वतःच असे तो ‘विजय‘

वैजयंतीमालेची त्याला गरज नाही

*

खरा मानव पुरोगामी

नाही दांभिक घमंडी

जयाच्या सेनेत घेई

लढायचा मान तो शिखंडी

*

जगणे त्याचे फार खरे

तलवारीस पाणी बुद्धीचे

रानात निराशेच्याही तरी 

आश्वासक सूर त्याच्या बासरीचे

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments