सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ मैत्रीत या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
नको सजवू तू
नको गाजवू तू
चल रुजवूया
मैत्र्य आता ||
नको सजवू तू
नको गाजवू तू
चल रुजवूया
मैत्र्य आता ||
नको जीव देऊ
नको जीव घेऊ
जीव जडवूया
मैत्रीत या ||
नको ते वचन
नको ती शपथ
काळीज जाणू या
दोघांचेही ||
नको तो खुलासा
नको तो उसासा
मिळेल दिलासा
मैत्रीत या ||
असो किती दुःख
असुदे ते सुख
दोघे अंतर्मुख
मैत्रीत या ||
कुठेही कसेही
जगाच्या या पाठी
एकमेकांसाठी
मैत्री असे ||
जीवाच्या पातूर
जयाच्या खातीर
जीव हा आतूर
मैतर हे ||
☆
सगळ्यांना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈