श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

रंजना जी यांचे साहित्य # 184 – माझे माहेर माहेर ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

(अष्टाक्षरी रचना)

माझे  माहेर माहेर।

जणू  सुखाचा सागर।

अशा थकल्या मनाला।

भासे मायेचे आगर॥

*

माय माऊलीचे प्रेम

जसा फणसाचा गर।

तिच्या शिस्तीच्या धारेला

शोभे वात्सल्याची जर॥

*

आंम्हा मुलांचे दैवत

बाबा आदर्शाची खाण ।

लाखो बालकांचा दादा

त्यांना साऱ्यांचीच जाण॥

*

नाही आपपर भाव

संस्कारांनी शिकविले।

हवी मनाची श्रीमंती

अंतरात रुजविले॥

*

प्रिती भावा बहिणीची

बंध रेशीम धाग्यांचा ।

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे

मंत्र यशस्वी नात्यांचा॥

*

असे माहेर लाखात

जणू बकुळीचे फूल।

 देव दिसे माणसात

देई संकटांना हूल।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments