सौ. उज्ज्वला केळकर
– संपादकीय –
💐 आज दि. १५ ऑगस्ट .. आपल्या ई-अभिव्यक्ति ऑनलाइन साहित्य-मंचाचा चौथा वर्धापन दिन 💐
दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी निव्वळ ‘ साहित्य-सेवा ‘ करण्याच्या उद्देशाने हा मंच कार्यरत झाला. अनेकजण आपल्या विविध विषयांवरील लिखाणामधून, कवितांमधून चांगल्या प्रकारे व्यक्त होत असतात आणि त्यांच्या हातून नकळत साहित्यनिर्मिती होत असते. असे साहित्य अनेक वाचकांपर्यंत सहजपणे आणि थेटपणे पोहोचावे यासाठी एक उत्तम मंच उपलब्ध व्हावा, हे या मंचाचे उद्दिष्ट होते आणि आहे.
आज हे सांगतांना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की या चारच वर्षात दोनशेहूनही अधिक लेखक / कवी त्यांचे साहित्य या मंचाच्या माध्यमातून असंख्य वाचकांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. आणि आपल्या या ब्लॉगला अंदाजे सव्वापाच लाखांहूनही जास्त वाचक नियमित भेट देत असतात. आजच्या या वर्धापनदिनी आपण सर्व लेखक-लेखिका, व कवी-कवयित्री यांचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करतो, आणि त्यांचे साहित्य असेच सदैव बहरत राहो अशा हार्दिक शुभेच्छा देतो. या मंचाला यापुढेही आपणा सर्वांचे असेच उत्स्फूर्त सहकार्य राहील याची खात्री आहे.
💐 ई-अभिव्यक्ति ऑनलाइन साहित्य-मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐
सौ. उज्ज्वला केळकर
श्री सुहास रघुनाथ पंडित, सौ. मंजुषा मुळे, सौ. गौरी गाडेकर
संपादक मंडळ – ई–अभिव्यक्ती (मराठी विभाग)
☆☆☆☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈