श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ वास्तव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
पाठीवर हात ठेऊन
लढ बाप्पा म्हणणारा
कुठे गुंतलाय
तेच काही
कळत नाही
निखळ ज्ञान देऊन
घडवणारा
आश्वासक गुरू
काही केल्या
मिळत नाही
काय करावे तरुणांनी ?
कुठे शोधावेत आदर्श ?
मार्गदर्शक
तेच आता
त्यांना सुचत नाही
संधीसाधू समाजात
बोकाळलेला स्वार्थ
कुठपर्यंत मुरलाय
याचा येत नाही
अंदाज
आपल्याकडं पहायचं सोडून
जो तो पहातोय
फक्त दुस-याकडं
दोष आपल्यातले
लादतोय दुसऱ्यांवर
आणि म्हणतोय
चाललंय तसं चालू द्या
आपल्या हातात काय आहे
मी सोडून सगळेच
वाया गेलेत
हेच आहे आजचं
वास्तव.
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈