सौ. सुनीता पाटणकर
कवितेचा उत्सव
☆ आम्ही जगतोय ???? ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
आम्ही जगतोय ?????
आम्ही जिवंत आहोत ?????
आमचे डोळे उघडे आहेत ????
आमचे कान बंद आहेत ?????
आमचं तोंड चालू आहे !
चार भिंतीत………
अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार,
याहून श्रेष्ठ बलात्कार !!!!
घटना घडतात,
चार दिवस बोंबाबोंब,
परत सगळं विसरायचं,
जीवन जगत रहायचं,
कसली न्यायव्यवस्था ?????
मुलीला डॉक्टर केली,
तिच्यावर बलात्कार झाला,
तिचा खून झाला,
दहा दिवस उलटले,
सगळे बलात्कारी,
निर्लज्ज, हलकट,
आरामात रिलॅक्स,
कसलीही भीती नाही,
लाज नाही,
बेशरम…….
यांना आई बहिणी नाहीत ?????
समाजानेचं यांचा,
न्याय करायला हवा,
यांचे बलात्कारी हत्यार,
उखडून टाका,
पुन्हा कृष्ण कृत्य करताना,
लाख वेळा भीती वाटली पाहिजे…….
तरच त्या यातना भोगलेल्या,
आत्म्यांना शांती लाभेल,
हे बंद झालं पाहिजे,
ममता तू बाईचं आहेस ना ????
किती निर्भया झाल्यावर,
चित्र पालटणार आहे?????
कायद्याचा आसूड,
कायद्याचा बडगा,
हे प्रत्यक्षात,
कधी येणार????
बाईचा खरा सन्मान,
तेव्हाच होणार……….
© सौ. सुनीता पाटणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈