सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ || लवकर येई तू रे बाप्पा || ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
लवकर येई तू रे बाप्पा .. लवकर येई तू रे बाप्पा ||
*
आतुरले रे सारे प्रियजन
सजविले घर, सजले अंगण
आनंदाचा ठेवा देण्या, हाच मार्ग सोप्पा ||
लवकर येई तू रे बाप्पा ||
*
दुर्वा आणि जपा सुमने
शेंदूर आणि शमीची पाने
पंचखाद्य नैवेद्याने
भरून सज्ज खोपा ||
लवकर येई तू रे बाप्पा ||
*
आलास की तू, नकोच जाऊस
सदैव राहो तव कृपा पाऊस
श्वासागणिक तव स्मरणाने
पार संकट टप्पा ||
लवकर येई तू रे बाप्पा ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈