सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 244
☆ गणपती जाताना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
गणपती बसतात घरोघर,
चौकात, मंडळात, शहरभर…
उसळते गर्दी —
आरास पहायला,
श्री गणेश तेजोमय,
निरखतोय स्वच्छ प्रकाशात,
आपल्या भक्तांना,
इथेही येतात दहा दिवस,
हवशे…नवशे…गवशे….
दहा दिवसांची जत्रा संपते,
वाजत गाजत गजानन,
जलाशयाकडे,
विसर्जनासाठी!
आयुष्यही असंच,
लखलखून विसर्जित होण्यासाठी !
गणेशोत्सवा सारखाच,
आयुष्योत्सव साजरा करू,
विसर्जित होणं, विलीन होणं,
हे तर अंतिम सत्य!
हाच असतो,
गणेशोत्सव !
गणपती जाताना
दरवर्षीच हेच सांगतो !
जगण्याचा अर्थ कळतो !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈