सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ आदरणीय कै. रतन टाटा यांना समर्पित ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
लक्षावरती लक्ष ठेऊनी
लक्ष कधीही साधत नाही
लक्ष साधण्या कर्तुत्वाचा
बाण सज्जता कामा येई
*
भात्यामधल्या बाणांनाही
निगुतीने जपावे लागते
हीच जपवणूक संधी येता
वेध साधण्या कामी येते
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈