सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री तारा भवाळकर
संपादकीय निवेदन
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
दिल्ली येथे आयोजित केलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झालेली आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे. त्या उतम वक्त्या, लेखिका, नाट्यप्रेमी व नाट्य अभ्यासिका आणि संशोधिका आहेत. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. लिहिण्या- बोलण्यातील नेमकेपणा आणि ठाशीवपणा हे त्यांचे वैशिष्ट्य.
ई-अभिव्यक्तीवरून दोन-अडीच वर्षांपूर्वी त्यांची मुलाखत क्रमश: ५ भागात प्रसारित केली होती. त्यांच्या निवडीबद्दल ई-अभिव्यक्तीच्या सर्व सभासदांना अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन उत्कृष्टपणे पार पडणार यात शंकाच नाही. त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि संमेलनासाठी शुभेच्छा.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈