सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ कोजागिरीची लावणी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

रात अवघी प्यायली, चांदणं हो पुनवेचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
चांदोबाही हसला, आला खुशी-खुशीतच

लाडात आला खाली, धरतीच्या जवळच

जमवून चटकचांदण्या, आवतन मैत्रीचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
धरती म्हणाली त्याला, तू चंद्रमा एकच

ये तूच जरा खाली, निमित्त आहे प्रेमाचं

दिसलं केशरी दुधात, बिंब हो चंद्राचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*
मित्र जमले अवघे, चांदणं पूनवेचं

लुटू या सारे मजा, देणं लाभलं आनंदाचं

आजच्या दिवसाला हो, महत्व जागरणाचं

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

*

रात अवघी प्यायली, चांदणं पुनवेचं 

बारामाही पुनव, येते कोजागरी एकदाच

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments