श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 260 ?

☆ नाही घाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

प्रीती सुमने नंतर दाखव नाही घाई

हळू प्रीतिचा वनवा पेटव नाही घाई

*

गुलाब आहे टवटवीत हा ओठी धरला

थोडा थोडा मधही चाटव नाही घाई

*

ओंजळीतुनी फुले आणतो आणि उधळतो

कधीतरी तू गजरा मागव नाही घाई

*

तुझीच इच्छा पूर्ण कराया येइल तेव्हा

मन भरल्यावर मजला पाठव नाही घाई

*

मातीवरती प्रेम कराया शिकून घ्ये तू

मग मातीवर डोके टेकव नाही घाई

*

देहाचे या वस्त्र मळाया नकोच आधी

त्या आधी तू शालू नेसव नाही घाई

*

ओठांवरती तुझ्या जेवढी आहे गोडी

त्या गोडीला मजला भेटव नाही घाई

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments