श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बोध… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

लहान होवून

याचक व्हावे

काहीच न मागून

मोठेपण घ्यावे…

 

जन्माला येण्याचे सार्थक

पुन्हा जन्माला न येणे

आणि उत्तम मरण म्हणजे

पुन्हा मरावे न लागणे..

 

विषारी विष

विषयातच आहे

दु:खाचे मूळ

जो विषयासक्त आहे..

 

येते जग जिंकता

ज्याने जिंकले मना

सद्गुरू कोण?

जो बोट धरून मोक्षापर्यंत नेई जना…

संदर्भ:- डॉ श्री.द.देशमुख – आद्य शंकराचार्य कृत प्रश्नोत्तरी

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments