प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्टेशनची कविता” ☆ प्रा. भरत खैरकर 

स्टेशनात जाणं

म्हणजे कविता मिळविणं..

कविता म्हणजे स्टेशन

पोहचणं अन् पुढे जाणं..

कविता लांब लांब गाडीसारखी..

कविता मालगाडी भरगच्च माल

भरुन येणारी सांडेस्तोवर..

कविता ‘एक्सप्रेस’ गाडी

सा-यांना हादरवून पुढे जाणारी.

कविता म्हणजे प्लॅटफॉर्म

विसावा देणारा..

कविता म्हणजे विचारांची गर्दी

स्टेशनवरची..

कविता मनाला समांतर

चालणारी दोन रूळांसारखी.. !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments