सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ आगंतुक… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
बागेच्या कोपर्यात एका वेलीवर अचानक नकळत त्यांचे अंकुरणे,
दुर्लक्षित वेलीला त्याने नवचैतन्य येणे
किती तो त्यांचा कसोशीचा प्रयत्न म्हणावा ?
न राहावून मी त्यांच्याजवळ गेले
नाजूक, पितवर्णी त्यांना निरखितच राहीले.
दुर्लक्षित अवहेलित त्या वेलीले
त्या आगंतुक फुलांनी मातृत्व बहाल केले.
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈