महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 196
☆ अभंग…☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
बालपण गेले, निघूनिया माझे
झाले पहा ओझे, तारुण्याचे.!!
*
बालपणा सवे, खूप काही गेले
मनात स्मरले, सर्व कोष.!!
*
खोड्या आठवल्या, काड्या आठवल्या
जागा आठवल्या, रमलेल्या.!!
*
काळा फळा सुद्धा, स्मृतीत राहिला
अधांतरी झाला, आता फळा.!!
*
काळा होता फळा, हिरवा जाहला
खडू बदलला, रंगा-सवे.!!
*
पाटी नि लेखणी, आणि उजळणी
घरी शिकवणी, होतं नाही.!!
*
दफ्तर फाटले, वह्याही फाटल्या
शाळेच्याही खोल्या, मृत-झाल्या.!!
*
असंख्य चित्रण, मनात बंदिस्त
जवळचे दोस्त, फितूरले.!!
*
कविराज म्हणे, लिहितांना शब्द
मनं हे निःशब्द, होते आहे.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈